प्रज्वल गायकवाड यांना ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर


ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६’ देवगडचे सुपुत्र श्री. प्रज्वल विनोद गायकवाड इनामदार यांना जाहीर झाला आहे. फोटोग्राफी व व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘आदर्श फोटोग्राफर’ या गटातून हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.


प्रज्वल गायकवाड हे मूळचे बापर्डे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेत ए. डी. फाउंडेशनने त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे.


सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ, स्वारगेट, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या यशाबद्दल प्रज्वल गायकवाड यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, मित्रपरिवार व मार्गदर्शकांना दिले आहे.


AR न्युज मराठी रुपेश डोलारे