धाराशिव : गांजा तस्करी प्रकरणातील गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या आरोपीची कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे संबंधित प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. स्पेशल केस क्र. 30/2024 (NDPS 8(c), 20(b), 20) अंतर्गत “सरकार विरुद्ध सौरभ व इतर” या प्रकरणात आरोपींवर गांजा तस्करीचे आरोप ठेवण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी व कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले होते. या कारवाईदरम्यान सुमारे 28 ते 30 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचा दावा सरकार पक्षाने केला होता. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा कसून उलटतपास केला. त्यांनी युक्तिवादात नमूद केले की, आरोपीने कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच NDPS कायद्यांतर्गत पंचनामा करताना आवश्यक कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यात आलेले नाही, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. पंचनाम्याच्या प्रक्रियेदरम्यान तसेच आरोपीची अंगझडती घेताना कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही बचाव पक्षाने ठामपणे मांडले. सरकार पक्ष आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचा मुद्दा अधोरेखित करत सर्वोच्च व उच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा दाखला देण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेऊन कळंब जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. राजे भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला. या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड. अमित गोळे, ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. संकेत गोरे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. रोहित लोमटे, पृथ्वीराज खोचरे व महेश पवार यांनी सहकार्य केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.