सभेपूर्वी कारवाई : शिवसेना कार्यकर्ते गणेश रोचकरी नजरकैदेत

 


तुळजापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करत शिवसेना कार्यकर्ते गणेश रोचकरी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तुळजापूर पोलिस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गणेश रोचकरी यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.