तुळजापूरात चेअरमन अनिल दादा हंगरगेकर यांचा सत्कार उत्साहात, संजय नाना शितोळे यांच्या वतीने हंगरगेकरांचा गौरव. सहकारी क्षेत्रातील कार्याबद्दल अनिल दादा हंगरगेकरांचा सन्मान. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त,चेअरमन अनिल दादा हंगरगेकर यांचे अभिवादन
तुळजापूर येथे चेअरमन अनिल दादा हंगरगेकर यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. जय भवानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, तुळजापूर, तसेच जय हनुमान कृषी व पणन प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, हंगरगा तुळ चेअरमन, आणि कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी मर्यादित, तुळजापूरचे संचालक अनिल दादा हंगरगेकर यांचा संजय नाना शितोळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिल दादा हंगरगेकर यांच्या सामाजिक व सहकारी क्षेत्रातील कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनिल दादा हंगरगेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विनम्र आदर व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनीही बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण काढली. कार्यक्रमास स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.