तुळजापूर येथे श्री साई सेवाभावी संस्था,लातूर संचलित शक्ती सदन संस्थेत डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

 


तुळजापूर : डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री साई सेवाभावी संस्था, लातूर संचालित शक्ती सदन संस्था, तुळजापूर येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण व अभिवादनाने करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अधीक्षिका सुरेखा पवार, कार्यालयीन सहाय्यक नितीन पवार, स्वयंपाकी प्रियांका कदम, सेक्युरिटी गार्ड घोंगडे सर व प्रणिता राठोड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी लाभार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. तसेच संस्थेतील लाभार्थ्यांनी बाबासाहेबांवरील गीतांवर नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमात बालकांना नाश्ता देण्यात आला तसेच मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले. अशा विविध उपक्रमांमुळे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.