तुळजापूर तालुक्यातील बहुचर्चित पवनचक्की खंडणी व दरोड्यातील आरोपींना जामीन मंजूर ॲड. ‍विराज जगदाळे यांचा प्रभावी युक्तिवाद

तुळजापूर:- तालुक्यातील मंगरूळ इटकळ रोडवरील दत्त मंदिराजवळ सोरिजिन आर. ई. सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे पवनचक्कीचे पाते घेऊन जाणारे ब्लेडर ट्रेलर व रोड क्लिअरन्स च्या गाडीस पाठीमागून मोटार सायकल वरून येत गाडी अडवून शिवीगाळ करत गंभीर स्वरूपाची मारहाण करून एक लाख रुपयांची खंडणी मागत फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये रक्कम काढून घेतल्याप्रकरणी दोन व्यक्तींवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५९/२०२६ कलम ३०९(२), ३०८(२) बी.एन.एस अन्वये दि. ०१/०४/२०२७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अटक आरोपींच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी मा. न्यायालयात आरोपींच्या बचावार्थ भक्कमपणे बाजू घेत कसोटीचा युक्तिवाद केला त्यानंतर मा. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपीस जामीन मंजूर केला आहे.