धाराशिव : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नूतन महासचिव अभिजीत चव्हाण यांनी येत्या काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने त्यांच्या महासचिवपदी निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील युवक-युवतींच्या बेरोजगारीच्या प्रश्नांवर, लघुउद्योगांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच शेतमजूर, महावितरण, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व घरकुल या मूलभूत प्रश्नांवर येत्या काळात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेऊन काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याची ग्वाही देत त्यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी सेवा दल काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवाजीराव गायकवाड, तालुका सेवा दल अध्यक्ष तानाजीराव जाधव, रसिक वाले, अॅड. रामचंद्र ढवळे, पंचायत समिती सदस्य गोविंद डोंगरे, युवा कार्यकर्ते फरीद शेख आदी उपस्थित होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.