सांगवी मार्डीच्या कृष्णा युवराज बागल यांचे दहावीत घवघवीत यश कृष्णा युवराज बागल यांनी मिळवले 90.80 टक्के गुण तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याची उज्ज्वल कामगिरी सरपंच युवराज बागल यांच्या सुपुत्राचे दहावी परीक्षेत यश

 

दहावी परीक्षेत कृष्णा बागल यांचे घवघवीत यश
तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील गावचे सरपंच युवराज बागल यांचे सुपुत्र कृष्णा युवराज बागल यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90.80 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


कृष्णा बागल हा तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, तुळजापूर येथील विद्यार्थी असून त्याने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिक्षकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कृष्णा बागल यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.