आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे पोलिसांना मारहाण करून पोलीस स्टेशन मधेच गुन्हा घडलेल्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता. आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस यांना धक्का देऊन सरकारी कामात अडथळा करून आनंद नगर पोलीस स्टेशन मधेच गुन्हा केलेल्या आरोपीची जिल्हा न्यायाधीश श्री येवलेकर यांनी केली निर्दोष मुक्तता, ॲड विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद

 


आनंद नगर पोलीस स्टेशन धाराशिव येथे पोलिसांना मारहाण करून पोलीस स्टेशन मधेच गुन्हा घडलेल्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता.
आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस यांना धक्का देऊन सरकारी कामात अडथळा करून आनंद नगर पोलीस स्टेशन मधेच गुन्हा केलेल्या आरोपीची जिल्हा न्यायाधीश श्री येवलेकर यांनी केली निर्दोष मुक्तता, ॲड विशाल साखरे यांचा प्रभावी युक्तिवाद.
सदर प्रकरणात आनंदनगर पोलीस स्टेशन मार्फत आरोपी नामे फरीद इस्माईल शेख यांच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 185/2023 हा कलम 353,332, 506 IPC प्रमाणे दोषारोप पत्र दाखल केले होते.
वास्तविक सदर प्रकरणात विचार करण्याची बाब म्हणजे सदरचा गुन्हा हा आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये घडला असून सदर गुन्ह्यातील आरोपीने त्याला मारहाण झाली केले बाबत तक्रार देण्यासाठी तो पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर संबंधित पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवत असताना महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी तक्रार नोंदवल्यानंतर सदरची तक्रारीची प्रत या आरोपी स दिली असता त्याने दारूच्या नशेमध्ये सदर महिला कॉन्स्टेबल ला कपाळावरती ढकलून दिले व तिथे गोंधळ करून आनंदनगर पोलीस स्टेशन येथून तो पळून गेला अशा प्रकारची फिर्याद ही आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या गुन्ह्या संदर्भात देण्यात आलेली होती. सदर प्रकरणात आरोपी फरीद इस्माईल शेख यांच्या वतीने ऍडव्होकेट विशाल प्रभाकर साखरे यांनी सदरील साक्षीदारा संदर्भात उलट तपास घेऊन विविध मुद्द्‌द्यावरती सदरील पोलीस साक्षीदारांना धारेवरती धरून वास्तविक पोलीस स्टेशन मध्येच एखादा व्यक्ती पोलिसांवरतीच हल्ला करून अथवा पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणून जर एखादा गुन्हा करत असेल ही बाब साक्षीदारांच्या दिलेल्या साक्षीवरून सिद्ध होत नसून ती संशयाच्या भवऱ्यामध्ये असल्याचे दिसून येते तसेच सदर प्रकरणात पोलिसांनी केवळ आरोपी हा तक्रार द्यायला गेल्यानंतर त्याची तक्रार त्याच्या सांगण्याप्रमाणे नोंदवली नाही त्याचप्रमाणे ती नोंदवली गेली नसल्यामुळे सदर आरोपीने माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्याकडे दाद मागितली याचा मनात राग धरून आनंदनगर पोलीस स्टेशन कर्मचारी तसेच आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी जाणीवपूर्वक आरोपी च्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणले बाबत व महिला पोलीस कर्मचारी हिला ढकलून देऊन तिच्यासोबत चुकीचे प्रत्येक केले बाबत चुकीची व खोटी तक्रार नोंदवली गेली असून सदर प्रकरणात वास्तविक परिस्थिती वेगळीच असल्याचा समर्पक व युक्तिवाद एडवोकेट विशाल प्रभाकर साखरे यांनी माननीय न्यायालयासमोर मांडला.
वास्तविक सदरील खटल्यामध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की घटनाही पोलीस स्टेशनमध्येच घडते. फिर्यादी ही पोलीस कॉन्स्टेबल महिला कर्मचारी तसेचसर्व साक्षीदार पडताळणी करता सदरील पोलीस कर्मचारी साक्षीदार या प्रकरणात वास्तविक साक्षीदारांचा सर तपास व उलट तपास याची पडताळणी केली असता सदर प्रकरणात एकही साक्षीदार हा फितूर झालेला नाही परंतु सदर प्रकरणात आरोपीचे विधीज्ञ एडवोकेट विशाल साखरे यांनी समर्पकपणे प्रत्येक पोलीस साक्षीदाराचा जो सर तपास आहे तो उलट तपासामध्ये योग्य त्या मुद्द्द्यावरती संशयाच्या भवऱ्यामध्ये आणला आणि इथेच सदरची केस ही टर्न आउट झाली आणि पोलीस साक्षीदारांच्या साक्ष मध्ये संशयात गोष्टी दिसून येत असल्याने माननीय जिल्हा न्यायाधीश श्री येवलेकर साहेब यांनी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तसेच अॅड विशाल साखरे यांनी सर्वोच न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे दाखले देत. आरोपींना चुकीच्या व खोट्या केस मध्ये अडकवल्याचे आणि आरोपींनी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा नसल्याचा प्रबळ युक्तिवाद अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी न्यायालयात सादर केला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री येवलेकर साहेब यांनी आरोपीची सदर खटल्यातून निर्दोष मुक्त केले. वास्तविक एकही सरकार पक्षाचा साक्षीदार फितूर झालेला नसतानाही अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी घेतलेला उलट तपास आणि बचाव सक्षम पने सिद्ध केल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी काम पाहिले व तर त्यांना ॲड. मंजूषा विशाल साखरे, ॲड महेश लोहार, ॲड शुभम तांबे, ॲड संकेत गोरे, ॲड अर्चना कांबळे, ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड अमित गोळे, ॲड आकाश येडके, ॲड ओंकार कोरेगावकर, ॲड रोहित लोमटे, ॲड पृथ्वीराज खोचरे, महेश पवार इत्यादींनी सहकार्य केले.