धाराशिव काँग्रेस भवनात उमेश राजे निंबाळकरांचा जल्लोषात सत्कार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत


धाराशिव येथे काँग्रेस भवनात नवनियुक्त काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. माझी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते उमेश राजे निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास विश्वास आप्पा शिंदे, राजाभाऊ शेरखाणे, नगरसेवक अमोल कुतवळ, खलील शेख सर, प्रशांत पाटील, धनंजय रणदिवे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेश राजे निंबाळकर यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.