तुळजापूर | प्रतिनिधी “द महाराष्ट्र फाइल्स” या आगामी मराठी चित्रपटाच्या सहनिर्माती व सहदिग्दर्शिका शालिनीताई संजीवकुमार राठोड यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू भैय्या गंगणे, शासनाच्या तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य प्रवीण पवार, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार माया माने यांच्या हस्ते आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन शालिनीताई राठोड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी “द महाराष्ट्र फाइल्स” या चित्रपटासाठी शुभेच्छा व्यक्त करत चित्रपटाच्या यशासाठी सदिच्छा दिल्या. पत्रकारांशी संवाद साधताना शालिनीताई राठोड म्हणाल्या की, “द महाराष्ट्र फाइल्स” या चित्रपटासाठी निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांनी मोठी मेहनत घेतली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी करावा लागणारा संघर्ष आणि सामाजिक वास्तव या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपट तयार करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.” या चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे, नागेश भोसले, मंगेश देसाई, संजीवकुमार राठोड, आर्यन राठोड यांच्यासह अभिनेत्री उषा नाडकर्णी, वीणा जामकर, गौतमी पाटील, सपना चौधरी, सनी लिओनी आदी कलाकार झळकणार आहेत. तसेच चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. “द महाराष्ट्र फाइल्स” हा सामाजिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा चित्रपट ठरेल, असा विश्वासही शालिनीताई राठोड यांनी व्यक्त केला.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.