ढोकी पोलिसांची मोठी कारवाई; चार घरफोडी गुन्हे उघड, एक आरोपी ताब्यात



दिनांक 06 मे 2026 रोजी पोलीस ठाणे ढोकीचे प्रभारी अधिकारी सपोनि विलास हजारे हे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे ढोकी येथील गु.र.नं. 143/2026 कलम 305(A) BNS मधील अज्ञात आरोपी हे 1) विकी सजगिर्या शिंदे, 2) कृष्णा श्रावण शिंदे आणि 3) अजय श्रावण शिंदे हे असून ते कोंड-सुंभा परिसरात फिरत आहेत.
माहितीच्या आधारे सपोनि विलास हजारे, पोउपनि माळी, ग्रेड पोउपनि सातपुते, पोलीस हवालदार बागवान, मपोना रोकडे, पोलीस अंमलदार महेश शिंदे, नवनाथ खांडेकर व लक्ष्मण शिंदे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले.
दरम्यान, आरोपी विकी सजगिर्या शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात मिळून आला. मात्र त्याच्यासोबत असलेले आरोपी कृष्णा श्रावण शिंदे व अजय श्रावण शिंदे यांनी पोलिस पथक पाहताच घटनास्थळावरून पळ काढला.
ताब्यात घेतलेल्या आरोपी विकी शिंदे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 39 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच 20 ग्रॅम वजनाचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अधिक चौकशीत आरोपीने ढोकी पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात पोलीस ठाणे ढोकी येथील
गु.र.नं. 46/2026 कलम 303(A) BNS
गु.र.नं. 55/2026 कलम 331(4), 305(A) BNS
गु.र.नं. 124/2026 कलम 305(8) BNS
गु.र.नं. 143/2026 कलम 305(A) BNS
असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास हजारे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.