धाराशिव : आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या आदेशानुसार आधुनिक लहुजी सेना धाराशिव जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आधुनिक लहुजी सेना सर्व जिल्हा पदाधिकारी, युवक आघाडी, महिला आघाडी, सर्व कार्यकर्ते तसेच सोमनाथभाऊ प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस संस्थापक अध्यक्षा आदरणीय नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे तसेच प्रदेशाध्यक्ष मा. लक्ष्मणभाऊ क्षीरसागर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये मातंग समाज व वंचित घटकांवर होणारे अन्याय-अत्याचार, संघटनात्मक बांधणी, तसेच जिल्ह्यातील विविध आघाड्यांवरील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक रविवार, दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे. संघटनेच्या सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव व भगिनींनी वेळेत उपस्थित राहून बैठकीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून मातंग समाज व वंचित घटकांच्या परिवर्तनासाठी काम करण्यास इच्छुक कार्यकर्ते व समाज बांधवांनी संपर्क साधावा.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.