मूळ गाव उंडरगाव (ता. लोहारा) व सध्या तुळजापूर येथील आदित्य ऊर्मिला बालाजी ढोबळे पाटील यांनी पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठातून बीबीए एलएलबी (BBA LL.B.) या पाच वर्षांच्या एकात्मिक विधी अभ्यासक्रमाची पदवी यशस्वीरित्या संपादन करून वकिली क्षेत्रात पदार्पण केले आहे. विश्वकर्मा विद्यापीठातील बीबीए एलएलबी हा पाच वर्षांचा एकात्मिक कायदा अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना व्यवसाय व्यवस्थापन (Business Administration) आणि विधी (Law) या दोन्ही विषयांचे सखोल शिक्षण दिले जाते. आदित्य यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि कायदे क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदित्य यांचे वडील श्री. बालाजी भैरिनाथ ढोबळे पाटील हे तुळजापूर येथील स्टॅम्प व्हेंडर असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच रोटरी क्लब तुळजापूरचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सदस्य आहेत. मुलाच्या या यशामुळे ढोबळे पाटील कुटुंबासह तुळजापूर परिसराच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यात आदित्य ढोबळे पाटील यांनी न्याय, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा या मूल्यांचा अंगीकार करून कायदे क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.