शेतकरी सुखी राहू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे; नाना पटोले यांचे आई तुळजाभवानी चरणी साकडे


तुळजापूर : काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना भाऊ पटोले यांनी सहपरिवार श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी राज्यातील शेतकरी सुखी राहावेत, शेतीला भरघोस उत्पादन मिळावे आणि "बळीराजाचे राज्य येऊ दे" असे भावपूर्ण साकडे आई तुळजाभवानीच्या चरणी घातले.
यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, शेतकऱ्यांची प्रगती आणि महाराष्ट्रात सुख, समृद्धी व शांतता नांदावी, अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, तुळजापूर नगर परिषद गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजित इंगळे, आनंद जगताप, तालुकाध्यक्ष अरविंद बेडगे, हरीश चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले यांच्या तुळजापूर भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.