तुळजापूर नगरपरिषदेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

तुळजापूर : तुळजापूर नगरपरिषदेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेविका सौ. श्वेता वैभव साळुंखे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, डॉ. सतीश भोसले, नगरसेवक पंडितराव जगदाळे, नगरसेवक सागर कदम, नगरसेवक रत्नदीप भोसले, नगरसेवक मधुकर (भैय्या) शेळके, वैभव सज्जनराव साळुंखे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नगरसेवक मधुकर (भैय्या) शेळके यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करून समाजात एकात्मता, राष्ट्रीय भावना आणि जनजागृती निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या विचारांमुळे समाज संघटित झाला आणि स्वातंत्र्य चळवळीला मोठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


कार्यक्रमाचा समारोप लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याला अभिवादन करून करण्यात आला.