तुळजापूर | प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर येथील घाटशिळ पार्किंग परिसरात उभी असलेल्या स्कॉडा स्लाविया कारची काच फोडून रोख ₹1 लाख 50 हजार व महत्त्वाची कागदपत्रे चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फिर्यादी नागराज सदानंद मडीवाळ (वय 29, रा. चिंचवाडा गाव पाली, ता. बिचोली नॉर्थ, जि. नॉर्थ गोवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 ते सायंकाळी 6.00 या वेळेत तुळजापूर येथील घाटशिळ पार्किंग, स्मशानभूमी रोड, इदगाहजवळ उभी असलेल्या त्यांच्या स्कॉडा स्लाविया (क्र. GA 04 E 9156) या कारची डाव्या बाजूची काच फोडून पर्समधील ₹1.50 लाखांची रोख रक्कम व कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार व पोलीस निरीक्षक श्री. मांजरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी आणि बळीराम शिंदे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मनोज महादेव धोत्रे (रा. वेताळ नगर, तुळजापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सदर चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील काही मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. जप्तीचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक श्री. थोटे यांनी केला असून आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.