अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल; ₹24,421 किमतीचा गुटखा जप्त

 


तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई केली. दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता वाघमारे गल्ली, माऊली पान शॉपच्या बाजूला, तुळजापूर येथे ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत संजय बाबुराव गलांडे (वय 55 वर्षे, रा. समर्थ नगर, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तत्सम पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगलेला आढळून आला.
पोलिसांनी गुटखा केसरयुक्त पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, बादशाह गुटखा, व्ही-1 टोबॅको, गोवा 1000, के.आर. शॉट 999 चुइंग टोबॅको आदी साहित्य असा एकूण ₹24,421 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 30(2)(अ), शिक्षापात्र कलम 59 व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात तुळजापूर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे.