महाराष्ट्र राज्य ला ताकदवान बनवण्यासाठी एक छोटीसी वाटचाल.......सर्व इंजिनियरिंग क्षेत्रातील तज्ञ लोकांनी आता पुढे येऊन आपल्या महाराष्ट्र राज्य कस आत्मनिर्भर होईल याचा विचार केला पाहिजे, महाराष्ट्र राज्य मधे आता पर्यंत झालेल्या विज्ञान प्रदर्शन मधील टेक्निकल प्रकल्प घेऊन त्याच योग्य वापर आपण कोणत्या जिल्हा साठी वापरू शकतो याचा विचार केला पाहिजे.
तर हो नांदेड मधे ग्रामीण टेक्निकल कॅम्पस या कॉलेज मध्ये नुकताच एक विज्ञान प्रदर्शन पार पडला होता, मी त्यातून एक छोटा सा प्रकल्प माझ्या विद्यार्थिनी ( प्रतीक्षा सोनकांबळे , संजना वाघमारे आणि कोमल खोडके ) समवेत हाती घेतला आहे.
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी अभिनव संशोधन प्रकल्प सादर - " जालना जिल्ह्यामधील स्टील इंडस्ट्री, महाराष्ट्र मधील MIDC, दिल्ली मधील वाढते प्रदूषण व वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण...!"
दिपक लिंबाजी राठोड. ( M.tech Structure Engineer )
सदर वायू प्रदूषण नियंत्रण प्रकल्प हा
Idea Base Project असून तो तनिष्का
तारगुडे व श्रद्धा शिंदे या पी.एम. श्री
झेड.पी. हायस्कूल (मुली), मुखेड येथील
इयत्ता 9 वीच्या विद्यार्थिनींच्या
संकल्पनेवर आधारित आहे. या
संकल्पनेवर पुढील सखोल संशोधन
करून हा प्रकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक
जिल्ह्यात राबविण्यासाठी महाराष्ट्राचे
विद्यमान मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे
पाठपुरावा करण्यात येणार असल्याची
माहिती दिपक राठोड यांनी दिली.
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्हे वायू प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल, नागरिकांचे आरोग्य सुधारेल तसेच आयुर्मान वाढण्यास हातभार लागेल. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये कार्बन विलगिकीकरण (Carbon Sequestration) तंत्रज्ञानाचा वापर करून कार्बनपासून नेल पॉलिश व मार्कर पेन इंक यांसारख्या उपयुक्त वस्तूंची निर्मिती करण्याचा अभिनव विचार मांडण्यात आला आहे.
आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात 53 विज्ञान प्रदर्शने झाली असून त्यातील बहुतांश प्रकल्प केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित राहिल्याचे आढळून आले आहे. यापुढे विज्ञान प्रदर्शनातील महत्वाचे व उपयुक्त प्रकल्प निवडून, त्यावर कमी खर्चात संशोधन करून, नव-नवीन इनोव्हेशन विकसित करत शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प दिपक राठोड यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाचे होणारे फायदे -
प्रमुख आजार/आरोग्य समस्या -
1) दमा (Asthma) आणि श्वास घेण्यास त्रास
2) ब्रॉन्कायटिस व सतत खोकला
3) COPD सारखे दीर्घकालीन फुफ्फुसांचे आजार
4) फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे
5) डोळ्यांची जळजळ, पाणी येणे
6) नाक व घशाची जळजळ
डोकेदुखी, चक्कर, मळमळ 7) काही विषारी वायूंमुळे
धुरातील काही विशिष्ट रसायनांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे फुफ्फुसाचा किंवा इतर कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
8) काही औद्योगिक धुळींमुळे Pneumoconiosis / Silicosis सारखे फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.
जर आपण हा प्रकल्प आणला तर , जालना जिल्ह्यामधील वरील आजारापासून मुक्तता मिळू शकते .
दिपक लिंबाजी राठोड



