धाराशिव, दि. 06 ऑगस्ट 2026* तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित *कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव या संस्थेला Amazon Web Services (AWS) ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यास अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या सेंटरचे मुख्य वैशिष्ट्ये: 1. *प्रशिक्षण*: या सेंटरद्वारे महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना Cloud Computing, Artificial Intelligence, Data Science, Cyber Security आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 2. *जागतिक प्रमाणपत्र*: प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना AWS चे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. 3. *उद्योगाभिमुख कौशल्य*: AWS हे जगातील अग्रगण्य क्लाऊड प्लॅटफॉर्म आहे. या सेंटरमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांसाठी आवश्यक असणारी कौशल्ये मिळून प्लेसमेंटच्या संधी वाढणार आहेत. प्राचार्य डाॅ.विक्रमसिंह माने यांनी *तंत्रज्ञान आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे हा आमचा उद्देश आहे. या AWS ट्रेनिंग सेंटरमुळे धाराशिवमध्ये राहून दर्जेदार प्रशिक्षण येथेच मिळणार आहे. लवकरच आम्ही प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करणार आहोत* असे सांगितले . प्रा.अनिरूद्ध देशपांडे AWS ट्रेनिंग सेंटर चे कोआर्डिनेटर म्हणून पाहत आहेत तर प्रा.दिपमाला भक्ते , प्रा.राजेश सरवदे , प्रा.अभिजीत बोरकर , AI&DS विभागप्रमूख प्रा.प्रदीप पवार , प्रा.कृष्णकांत मूळे , प्रा.मनिषा वाकूरे , प्रा.अमृता पिंपळे , प्रा.वैष्णवी पाटील हे कोर्स ईन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहतील . प्रामूख्याने ईलेक्ट्राॅनिक्स अॅंड टेलिकाॅम , आर्टिफिशिअल ईंटलिजंस अॅंड डेटा सायंस , कम्प्यूटर सायंस अॅंड ईंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे तसेच मेकॅनिकल आणि सिव्हील क्षेत्रातील विद्यार्थी ज्यांना AWS या क्षेत्रात काम करायचे आहे त्यांनाही लाभ घेता येणार आहे .
तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.पद्मसिंह पाटील , आमदार राणाजगजीतसिंह पाटील , विश्वस्त मल्हार पाटील , व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले असून, या सेंटरमुळे मराठवाड्यातील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या निर्णयामुळे *तेरणा ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव* ही प्रदेशातील आघाडीची तंत्रशिक्षण संस्था म्हणून अधिक बळकट होण्यास मदत मिळेल व विद्यार्थी यांची स्किल वाढेल.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.