जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर केमवाडीच्या सोहेल शकील शेख यांची महसूल विभागात अधिकारीपदी निवड


तुळजापूर प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सोहेल शकील शेख यांनी अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अधिकारी म्हणून यश संपादन केले आहे. ते मुंबई येथे आपल्या शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.

सोहेल शकील शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे केमवाडी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या यशाबद्दल बोलताना आदम बापुसाहेब पठाण यांनी सांगितले की, "सोहेल यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे."
सोहेल शकील शेख यांना त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.