स्मार्ट मीटर योजनेविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसचे,१३ ऑगस्ट रोजी निषेध आंदोलन


धाराशिव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणकडून ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येऊन सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक बोजा पडत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर योजना तात्काळ स्थगित करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या मागणीसाठी गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 12 वाजता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर, ताजमहल टॉकीजजवळ, धाराशिव येथे निषेध आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनास धाराशिव जिल्ह्यातील पत्रकार, प्रतिनिधी, कॅमेरामन व छायाचित्रकारांनी उपस्थित राहून वार्तांकन करावे, असे आवाहन धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. उमेश राजे निंबाळकर यांनी केले आहे.
आंदोलनाची माहिती :
दिनांक : गुरुवार, 13 ऑगस्ट 2026
 वेळ : सकाळी 12.00 वाजता
 स्थळ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, ताजमहल टॉकीजजवळ, धाराशिव
 प्रमुख मागणी : स्मार्ट मीटर योजना तात्काळ स्थगित करावी.