खोटे निवेदन देऊन बदनामी केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा पत्रकार संतोष दुधभाते यांचा इशारा.

 



तुळजापूर:
 तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील रहिवासी तथा पत्रकार संतोष राजेंद्र दुधभाते यांनी खोटे निवेदन देऊन आपली बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस ठाणे तुळजापूर येथे एक तक्रारी अर्ज दिला असून, दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  




नेमके प्रकरण काय?
 मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वडगाव लाख (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेले पत्रकार संतोष राजेंद्र दुधभाते यांची काही जणांकडून खोटे निवेदन देऊन बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी शिवाजी गोरोबा दांगट, संजय खुरूद आणि ज्ञानेश्वर गवळी या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची नम्र विनंती अर्जाद्वारे केली आहे.
  कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
   या अर्जाच्या माध्यमातून पत्रकार संतोष दुधभाते यांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिला आहे. संबंधित आरोपींवर दिनांक २०/०८/२०२६ पर्यंत गुन्हा नोंद न झाल्यास, ते आपल्या पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे.असे दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे, या निवेदनावर पत्रकार संतोष दूधभाते यांची स्वाक्षरी आहे.


   या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात आणि २० ऑगस्टपूर्वी गुन्हा दाखल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.