धाराशिव : बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ढोकी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ यास माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी-शर्तींच्या अधीन राहून नियमित जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात BNS कलम 64(2)(i), 64(2)(m), 333, 351(2), 351(3) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोपी क्रमांक १ यांच्या वतीने अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला. जामीन अर्जावर युक्तिवाद करताना बचाव पक्षाच्या वतीने फिर्याद दाखल करण्यास झालेला विलंब, घटनेबाबत तत्काळ माहिती न दिल्याचा मुद्दा, DNA संदर्भातील बाबी तसेच फिर्यादीत नमूद केलेल्या घटनेच्या तारखेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच, फिर्यादीत नमूद केलेल्या घटनेच्या दिवशी जिल्हा परिषद शाळेला शासकीय सुट्टी असल्याचे संबंधित शासन निर्णयाच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला. त्यामुळे फिर्यादीतील घटनाक्रमाबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. आरोपीचा कथित घटनेशी संबंध नसल्याचे तसेच आरोपीस खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला. तपास पूर्ण झालेला असून दोषारोपपत्र दाखल झाले असल्याने आरोपीस नियमित जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या युक्तिवादादरम्यान अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांनी माननीय उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे न्यायालयासमोर सादर केले. बचाव पक्षाचा युक्तिवाद व प्रकरणातील उपलब्ध बाबी विचारात घेऊन माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ठुबे साहेब यांनी आरोपीस अटी-शर्तींच्या अधीन राहून नियमित जामीन मंजूर केला. सदर प्रकरण रजिस्टर क्र. 59/2026 अंतर्गत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांना अॅड. मंजुषा विशाल साखरे, अॅड. महेश लोहार, अॅड. अमित गोळे, अॅड. शुभम तांबे, अॅड. संकेत गोरे, अॅड. अर्चना कांबळे, अॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, अॅड. आकाश एडके, अॅड. ओंकार कोरेगावकर, अॅड. रोहित लोमटे, अॅड. पृथ्वीराज खोचरे व अॅड. महेश पवार यांनी सहकार्य केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.