धाराशिव : महाराष्ट्रातील लावणी, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील डीजे लावणीसह आक्षेपार्ह सादरीकरणांना आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने केलेल्या मागणीची शासनाने दखल घेतली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले असून, या निर्णयाबद्दल विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे आणि जिल्हाध्यक्ष सुगत सोनवणे यांनी अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नियम व योग्य प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याची मागणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे केली होती. त्याची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने आवश्यक निर्देश दिले आहेत. नव्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग आणि मेळे आदी कार्यक्रमांची संहिता, निवेदन व सादरीकरण तपासले जाणार आहे. तसेच संबंधित कार्यक्रमांसाठी मंडळाचे Suitability Certificate आवश्यक राहणार आहे. नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे म्युझिक किंवा आक्षेपार्ह सादरीकरण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या निर्णयामुळे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लावणी आणि सांस्कृतिक परंपरेचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने म्हटले आहे..ही मागणी पूर्ण झाल्या बद्दल राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.