अपसिंगा रोडवरील विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या सभा मंडप उभारणीचा शुभारंभ


तुळजापूर, दि. १० सप्टेंबर २०२६ : अपसिंगा रोड येथील विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सभा मंडप उभारणीचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. मंडळाचे आधारस्तंभ तथा माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते श्री. जयकुमार नागनाथ पांढरे, तुळजापूर यांच्या हस्ते सभा मंडप उभारणीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मंडळाचे संस्थापक ऋषी वांजरे, मार्गदर्शक योगेश शेरखाने, अध्यक्ष गणेश निकम, उपाध्यक्ष अनिकेत क्षीरसागर, सचिव वैभव पायाळे, कोषाध्यक्ष सोहम घावटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यास इनुस सय्यद, शुभम कांबळे, ऋषी वांजरे, अनिकेत शिरसागर, गोपाळ गवळी, रंजीत रोकडे, मैनुद्दीन शेख, संजय घावटे, बबन राठोड, शिवाजी पवार, सत्यजित रोकडे, सोहम घावटे, अरमान शेख, सुरज गोरे, रेहान सय्यद, वैभव पायाळे, आसरा शेख, विशाल मोरे, प्रथमेश राठोड, अभिजीत सोनवणे व अस्तित्व दूधभाते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.