देवकुरुळी, दि. १३ सप्टेंबर २०२६ : श्री सिध्दीविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज विधिवत व उत्साहपूर्ण वातावरणात श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मिनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला.
कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात व्हावी, कारखान्याचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे तसेच ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी व संबंधित सर्व घटकांच्या सहकार्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी या वेळी संकल्प करण्यात आला.
यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने आगामी हंगामासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. कारखान्याची यंत्रसामग्री, तांत्रिक व्यवस्था तसेच विविध विभागांची तयारी पूर्ण करण्यात आली असून, २०२६-२७ चा गळीत हंगाम नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधितांचे योगदान महत्त्वाचे असून, आगामी हंगामात सर्वांच्या सहकार्याने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू राहील, असा विश्वास दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुकुंद कुलकर्णी, बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, प्रतिक देवळे, अरविंद गोरे, मंगेश कुलकर्णी, विकास उबाळे तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. सन २०२६-२७ चा गळीत हंगाम यशस्वी, सुरक्षित व समाधानकारक ठरो, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.