नवनिर्वाचित विधान परिषद आमदार बस्वराज पाटील यांची सदिच्छा भेट; घरच्या गणपतीची आरती


भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार तथा माजी मंत्री बस्वराज पाटील यांनी आज सदिच्छा भेट देत घरच्या गणपतीची आरती केली.


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, शिवांकुर बोधले व सौ. सुदर्शनी शिवाजी बोधले यांनी आमदार बस्वराज पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला.
यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंके, पत्रकार व प्रसिद्ध व्यावसायिक गुरुनाथ बडूरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे (उमरगा), मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन पाटील, नगरसेवक लखन पेंदे, खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले, धैर्यशील दरेकर, मोर्डा गावचे सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे, तालुका सरचिटणीस कृष्णा साळुंके, धनंजय पाठक, विक्रम माडजे, कुबेर जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी आमदार बस्वराज पाटील यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.