लोटस पोदार लर्न स्कूल उमरगाच्या रणवीर राहुल हेबाडेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड

उमरगा : धाराशिव जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत लोटस पोदार लर्न स्कूल, उमरगा येथील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी मास्टर रणवीर राहुल हेबाडे याने उल्लेखनीय यश संपादन केले.
तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रणवीरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ५ फेऱ्या जिंकून धाराशिव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची विभागीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रणवीरच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. व्यंकट अरगडे सर, उपाध्यक्ष श्री. युवराज गायकवाड, सचिव श्री. विशाल कोकरे, संचालक श्री. पद्माकर पाटील सर, श्री. उज्वल कारभारी सर, श्री. धनराज हावळे सर, श्री. चिदानंद माणिकशेटी सर, श्री. योगेश सूर्यवंशी सर, सौ. संजीवनी अरगडे मॅडम, सौ. सुषमा कोकरे मॅडम, सौ. जयश्री पत्रिके मॅम, श्री. संतोष अरगडे, श्री. विक्रम कोकरे, श्री. वैभव धोत्रे, सौ. स्मिता पांढरे मॅम, प्राचार्य बी. पी. सिंग, उपप्राचार्य अतुल फावडे, सौ. विभावरी थिटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रणवीरचे अभिनंदन केले.
रणवीरच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.