तुळजापूर, दि. २८ सप्टेंबर २०२६ : तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कथित गैरवर्तन, शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीस तुळजापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, १३२, ३५२, १२६(२) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध) अधिनियम, २०१० मधील कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता संबंधित आरोपी एका महिला रुग्णासोबत उपजिल्हा रुग्णालयात आला होता. महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने उपचार करण्याच्या मागणीवरून आरोपीचा डॉक्टरांशी वाद झाला. यावेळी कथित शिवीगाळ, गैरवर्तन तसेच डॉक्टरांच्या अंगावर धावून जाऊन मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून १६ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीस अटक केली होती. आरोपीच्या वतीने ॲड. विराज विलासराव जगदाळे यांनी न्यायालयात बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संजय पवार यांचे मार्गदर्शन, तर ॲड. ओंकार मस्के यांचे सहकार्य लाभल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.