सांगवी (मार्डी) शाळेत पूर्णवेळ उपस्थित विद्यार्थ्यांचा अनोखा गौरव; मुख्याध्यापिका माने मॅडम यांचा स्तुत्य उपक्रम



तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे.
सांगवी (मार्डी), दि. २८ सप्टेंबर २०२६,रोजी जि. प. प्रा. शा. सांगवी (मार्डी) येथील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये शाळा व अभ्यासाबद्दल गोडी निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढावी या उद्देशाने राबविलेला प्रोत्साहनपर उपक्रम आज फलद्रूप झाला.
मागील आठवड्यात सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळच्या परिपाठापासून शाळा सुटेपर्यंत पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहून वर्गशिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इयत्ता पहिली ते सातवीतील पूर्णवेळ उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका माने मॅडम यांच्या वतीने टिफिन बॅग बक्षीस म्हणून देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये नियमित शाळेत येण्याची सवय निर्माण व्हावी, अभ्यासाची आवड वाढावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पूर्णवेळ उपस्थित राहून बक्षीस मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी असा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माने मॅडम यांचे पालक व विद्यार्थी वर्गातून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.