लोहारा : प्रतिनिधी रुपेश डोलारे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ६ मध्ये मौजे वडगाव वाडी येथील साठवण व पाझर तलावांचा समावेश करावा, तसेच मारुती देवस्थान इनाम जमिनीमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मौजे वडगाव वाडी येथील अर्जदार आकाश प्रकाश भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. टप्पा क्रमांक ६ (रामदरा ते एकुरगा) अंतर्गत बेलवाडी व माळेगाव (पा.) येथील साठवण तलावांचा समावेश आहे. वडगाव वाडी हे या दोन्ही गावांच्या मध्यभागी असून बेलवाडी ते माळेगावदरम्यान प्रस्तावित मुख्य जलवाहिनीच्या मार्गालगत वडगाव वाडी शिवारातील साठवण व पाझर तलाव तसेच मारुती मंदिर देवस्थान इनाम जमिनीचा परिसर येतो. त्यामुळे वडगाव वाडी येथील तलावाचा योजनेत समावेश करणे तांत्रिकदृष्ट्या सुलभ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मौजे वडगाव (गां.) येथील साठवण तलावासाठी २६ डिसेंबर २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या तलावासाठी सुमारे ४८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून बाधित शेतकऱ्यांना सुमारे १८ ते २० कोटी रुपयांचा मोबदला वितरित झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच सुमारे ११.२६ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद आहे. लोहारा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे वडगाव वाडी येथील साठवण तलावाचा कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यात समावेश करावा, मारुती मंदिर देवस्थान इनाम जमिनीमध्ये पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत आणि वडगाव (गां.) साठवण तलावाचे प्रत्यक्ष काम विनाविलंब सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दुष्काळ निवारण निधी व उपलब्ध सवलतींच्या माध्यमातून परिसरातील जलसंधारणाच्या कामांना तातडीने गती देण्याची मागणी आकाश प्रकाश भुजबळ व समस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.