तुळजापूर शहरात प्रथमच साऊथ इंडियन महालक्ष्मी आरास देखावा

 

तुळजापूर : तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथील नगरसेवक श्री. मधुकर भैय्या शेळके यांच्या निवासस्थानी यंदा पारंपरिक गौरी-महालक्ष्मी आरास निमित्त साऊथ इंडियन पद्धतीचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
तुळजापूर शहरात प्रथमच साऊथ इंडियन संकल्पनेवर आधारित महालक्ष्मी आरास देखावा साकारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.


यंदाच्या देखाव्यात महाराष्ट्रासह धाराशिव जिल्हा आणि मराठवाड्यातील शेतकरी बांधवांची दुष्काळग्रस्त परिस्थिती केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. निसर्गाच्या बदलत्या परिस्थितीशी सामना करताना शेतकरी शासनाच्या विविध योजना, मदत आणि आशेकडे पाहत असल्याचे वास्तव या देखाव्यातून मांडण्यात आले आहे.


शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनातील घडामोडी, पिकांची परिस्थिती, पावसाची प्रतीक्षा आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या अपेक्षा यांचे चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीतील महादेवाचा देखावा आणि हिंदू संस्कृतीतील पारंपरिक गौरी-महालक्ष्मी आरास यांचा संगम साधत साकारलेला हा आगळावेगळा साऊथ इंडियन देखावा तुळजापूर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.