धाराशिव शहरात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी, गुन्हा दाखल.

 


धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील 32 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, संबंधित तरुणाने तिच्याशी फोनवर संदेशाद्वारे संपर्क साधून त्रास दिला तसेच छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडितेने 17 सप्टेंबर 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 64(2)(M), 75, 352, 351(2)(3) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.