राजा कंपनी तरुण मंडळाच्या गणपतीची मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती संपन्न


तुळजापूर शहरातील राजा कंपनी तरुण मंडळाच्या ‘श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची आज सकाळची आरती उत्साहात संपन्न झाली.
या आरतीचे प्रमुख यजमान म्हणून अरीफ बागवान, मतीन बागवान, युसूफ बागवान, रसुफ बागवान, जावेद बागवान, रईप बागवान, फिरोज पठाण, मुसा नदाफ, श्री. मल्हार दादा पाटील व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सभासद तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश या आरती सोहळ्यातून देण्यात आला.
आरतीनंतर उपस्थित भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.