तुळजापूर येथील सिद्धिविनायक मल्टी टेस्ट बँकेत गणेश मूर्तीची आरती व पूजन


तुळजापूर येथील सिद्धिविनायक मल्टी टेस्ट बँकेत श्री गणेश मूर्तीची आरती व पूजन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. मधुकर भैय्या शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँकेचे व्यवस्थापक रोहित दळवी यांच्यासह बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. गणरायाची आरती करून उपस्थितांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले.