तुळजापूर | दि. २० सप्टेंबर २०२६ : पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, उडीद, बाजरी, मका तसेच द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) तुळजापुरात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन तहसील कार्यालयावर नेण्यात येणार आहे. मोर्चामध्ये तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफी करून नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, चालू पीककर्जाचे व्याज माफ करावे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, पीक विम्याची तात्काळ भरपाई द्यावी, जनावरांसाठी पाणी व चारा छावण्या सुरू कराव्यात, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी व बोअर अधिग्रहित करून व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व मोफत एस.टी. पास देण्यात यावेत तसेच महिला शेतकरी बचत गटांच्या कर्जवसुलीस स्थगिती देऊन व्याज माफ करावे, अशीही मागणी करण्यात येणार आहे. “शेतकरी वाचला तरच शेती वाचेल, शेतकरी वाचला तरच गाव वाचेल,” या भूमिकेतून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मोर्चाचे आयोजन ॲड. धिरज आ. पाटील, मा. अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, धाराशिव; ॲड. अरविंद बेडगे, अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, तुळजापूर; तसेच श्री. अमोल कुतवळ, कार्याध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.