दि.19/09/2026 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार सो यांचे आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करिता स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथक रवाना होवुन पेट्रोलिंग करीत कळंब येथील चौकात आले असता पथकास गोपनिय बातमी मिळाली की एक इसम हा भाटसांगवी पाटीजवळ थांबलेला आहे व त्याचेजवळ एक गावठी पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदरची माहिती वरीष्ठांना कळवुन लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी 16.00 वा. आले असता माहिती मधील इसम भाटसांगवी पाटीजवळ थांबलेला दिसला. पथकातील स्टाफने तात्काळ गाडीतुन उतरून त्यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गावाबाबत विचारले असता त्याने त्याचे नाव नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे, रा. भाटसांगवी ता. कळंब जि. धाराशिव असे सांगीतले त्याची अंगझडती घेतली असता नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे याचे कंबरेला खोवलेला एक लोखंडी धातुचा त्यास लाकडी पिस्टल ग्रीप असलेला गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असे 26,000/- रू. किमतीचे मिळुन आले. नमुद आरोपीची वैदयकीय तपासणी करून त्याचेविरूध्द पोलीस ठाणे कळंब येथे अवैधरित्या शस्त्र बाळगलेप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कळंब येथे हजर केले आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. अमोल मोरे, पोह/ अमोल चव्हण, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे चापोअं / दहीहांडे, RCP चार पोलीस अमंलदार यांचे पथकाने केली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.