लोटस पोदार लर्न स्कूल उमरगाच्या रणवीर हेबाडेची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड

उमरगा : उमरगा तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा प्रशाला सुपातगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत लोटस पोदार लर्न स्कूल, उमरगा येथील इयत्ता ८ वीचा खेळाडू रणवीर राहुल हेबाडे याने उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.
रणवीरने स्पर्धेतील सर्व ६ फेऱ्या जिंकून उमरगा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रणवीरच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. व्यंकट अरगडे सर, उपाध्यक्ष श्री. युवराज गायकवाड, सचिव श्री. विशाल कोकरे, संचालक श्री. पद्माकर पाटील सर, श्री. उज्वल कारभारी सर, श्री. धनराज हावळे सर, श्री. चिदानंद माणिकशेटी सर, श्री. योगेश सूर्यवंशी सर, सौ. संजीवनी अरगडे मॅडम, सौ. सुषमा कोकरे मॅडम, सौ. जयश्री पत्रिके मॅम, श्री. संतोष अरगडे, श्री. विक्रम कोकरे, श्री. वैभव धोत्रे, सौ. स्मिता पांढरे मॅम, प्राचार्य बी. पी. सिंग, उपप्राचार्य अतुल फावडे, सौ. विभावरी थिटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रणवीरचे अभिनंदन केले.
रणवीरच्या या उत्कृष्ट यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.