धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ निरोगी बालक, सुदृढ भविष्य! आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील एकुण 436243 बालकांना दिल्या जानार जंतनाशक गोळ्या.
AR न्यूज मराठी धाराशिव. रुपेश डोलारे धाराशिव, दि. २७ ऑक्टोबर २०२६ : बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे, जंतसंसर्गामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या टाळणे तसेच बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला शुभारंभ करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, येडशी येथे मा.जिल्हाधिकारी किर्तीकरिण पुजार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदशनाखली या मोहिमेचे उद्घाटन प्रा.आ.केंद्र येरमाळा अतर्गंत जिल्हा परीषद शाळा येरमाळा येथे करण्यात आले. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 1461 शाळा,1748 आंगणवाडी व 303 आरोग्य् संस्था मध्ये 1ते १९ वयोगटातील एकुण 436243 लाथार्थी मुला-मुलींना आज एकाच दिवशी जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहेत. या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी आणि जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गोवर्धन महेद्रंकर, वैद्यकिय अधिकारी डॉ.सुधाकर बिरादार प्राथमिक आरोग्य केंद्र, येडशी यांची प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून मोहीम राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत १ ते १९ वयोगटातील पात्र बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना निर्धारित मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक गोळ्या देण्यात येतील. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अंगणवाड्यांमधील पात्र बालकांपर्यंत पोहोचून त्यांना जंतनाशक औषधोपचाराचा लाभ देण्यावर भर देण्यात येणार आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जंतसंसर्गामुळे बालकांच्या आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आतड्यांतील जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जंतसंसर्गामुळे शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकांचे शोषण कमी होणे, रक्तक्षय, अशक्तपणा, भूक मंदावणे आणि शारीरिक वाढीवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय बालकांच्या एकाग्रतेवर, शिकण्याच्या क्षमतेवर आणि बौद्धिक विकासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच आज एखाद्या लाभार्थी बालक आजारी किंवा इतर आरोग्य विषयक समस्या असल्यास औषध देण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा व श्क्य नसल्यास दिनांक 3 नोव्हेबंर 2026 रोजी मॉप दिनाच्या दिवशी आपल्या पाल्यांना शाळा, अंगणवाडी किंवा संबंधित आरोग्य संस्थेत जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. बालकांच्या शरीराची योग्य वाढ होण्यासाठी आणि त्यांची पोषणस्थिती चांगली राहण्यासाठी जंतसंसर्गाचे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येते. निर्धारित वयोगटातील पात्र बालकांना योग्य पद्धतीने जंतनाशक औषध दिल्यास जंतसंसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते. जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी असे आवाहन केले. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन जंतसंसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, नखे नियमित कापणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या सवयी बालकांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहून आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शारीरिक क्षमता आणि सर्वांगीण विकास साधण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी कले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.