नळदुर्ग परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंशीय मांसाची वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अणदूर बसस्थानकासमोर एका ॲपे वाहनातून गोवंशीय मांसाची वाहतूक केली जात असल्याचे नळदुर्ग पोलिसांच्या पथकाला आढळून आले. संबंधित वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १५ किलो गोवंशीय मांस आढळले. या मांसाची किंमत २१ हजार रुपये असून, वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ५२ हजार १०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी महंमद युनुस इस्माईल कुरेशी (वय ५६, रा. नानीमॉ रोड, नळदुर्ग), इलाही मुसा कुरेशी (वय ३४, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग) आणि शिरीष शिवाजीराव डुकरे (वय ३८, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारतर्फे गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५(अ), ५(क) व ९(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.