सांगवी मार्डी शाळेत १००% उपस्थिती व गृहपाठ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव!

 

AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे तुळजापूर 


सांगवी मार्डी | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगवी मार्डी येथे १००% उपस्थिती नोंदविणाऱ्या तसेच १००% गृहपाठ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. माने मॅडम यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये नियमित उपस्थिती, अभ्यासाची आवड आणि शिस्त निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.