लोटस पोदार लर्न स्कूलच्या आनंदी पांचाळची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड! राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावत उमरग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे धाराशिव.


उमरगा : लोटस पोदार लर्न स्कूल, उमरगा येथील विद्यार्थिनी कु. आनंदी ज्ञानेश्वर पांचाळ हिने शालेय राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले असून, तिची शालेय राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत लोटस पोदार लर्न स्कूल, उमरगा येथील परिक्षीत श्रीकांत निकम, रिती महेंद्रनाथ बिस्वास, आनंदी ज्ञानेश्वर पांचाळ आणि शर्वरी राम माने या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत आनंदी ज्ञानेश्वर पांचाळ हिने पीप साइट एअर रायफल शूटिंग या क्रीडाप्रकारात उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करत रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) मिळवले. तिच्या अचूक नेमबाजीने, एकाग्रतेने आणि सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्तरावरील शालेय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही आनंदीसाठी तसेच शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.
आनंदीच्या या यशामुळे उमरगा शहरासह शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. तिच्या या यशामागे नियमित सराव, कठोर मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री. गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API), मुरूम यांनी आनंदी पांचाळ हिचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 खेळाडूच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. व्यंकट अरगडे सर, उपाध्यक्ष श्री. युवराज गायकवाड, सचिव श्री. विशाल कोकरे, संचालक श्री. पद्माकर पाटील सर, श्री. उज्वल कारभारी सर, श्री. धनराज हावळे सर, श्री. चिदानंद माणिकशेटी सर, श्री. योगेश सूर्यवंशी सर, सौ. संजीवनी अरगडे मॅडम, सौ. सुषमा कोकरे मॅडम, सौ. जयश्री पत्रिके मॅम, श्री. संतोष अरगडे, श्री. विक्रम कोकरे, श्री. वैभव धोत्रे, सौ. स्मिता पांढरे मॅम, प्राचार्य बी. पी. सिंग, उपप्राचार्य अतुल फावडे, सौ. विभावरी थिटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंदीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या परिक्षीत निकम, रिती बिस्वास आणि शर्वरी माने या खेळाडूंचेही कौतुक करण्यात आले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या आनंदी पांचाळला सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, राष्ट्रीय स्तरावरही ती उज्ज्वल यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.