राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य युवकांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश! काँग्रेसचे हात बळकट करण्याचा युवकांचा निर्धार;

 


AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे धाराशिव 


संविधानाचे रक्षण, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि काँग्रेस पक्षाचे हात अधिक मजबूत व बळकट करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्हा काँग्रेस भवन येथे असंख्य युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली विश्वजीत (आबा) बनसोडे यांच्यासह अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जपण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार नवप्रवेशित युवकांनी व्यक्त केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष धनंजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे नवयुवकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या संख्येने युवक काँग्रेस पक्षाशी जोडले जात आहेत. युवकांचा हा वाढता सहभाग ही केवळ सुरुवात असून आगामी काळात आणखी मोठ्या संख्येने युवक काँग्रेसच्या विचारधारेसोबत जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या युवकांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिव शहरातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला नवे बळ मिळणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये पक्षाचे संघटन अधिक मजबूत व व्यापक करण्यासाठी नव्या युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असून, युवकांच्या माध्यमातून पक्षाचा जनसंपर्क वाढवून तळागाळातील नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद सपकाळ, शहर कार्याध्यक्ष संजय गजधने, पोपट शिंदे, शहर उपाध्यक्ष बाबा मोमीन, ओबीसी शहराध्यक्ष हरिदास शिंदे, सोशल मीडिया धाराशिव तालुकाध्यक्ष दिगंबर गायकवाड, कृपालसिंह ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षाचे सहकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या युवकांमध्ये विश्वजीत (आबा) बनसोडे, सुमित आवटे (छाया दीप लॉन्समागे, दत्तनगर), भूषण बनसोडे (भीमनगर), विश्वभूषण बनसोडे (भीमनगर), ओंकार जगदाळे (दत्तनगर), पृथ्वीराज गटकर (दत्तनगर), निशांत कदम (दत्तनगर), रुपेश मोरे (दत्तनगर), विश्वजीत कांबळे (भीमनगर), यश ओव्हाळ (सांजा रोड), पवन गिराम (दत्तनगर), आदित्य धवरे (दत्तनगर), शरद माने (दत्तनगर), ओमराजे मुळे (तेरणा कॉलेज), आदित्य गायकवाड (तेरणा कॉलेज), सुयश माने (तेरणा कॉलेज), समर्थ वाट (तेरणा कॉलेज), सागर धवरे (पोहनेर), सुदर्शन पाटील (तेरणा कॉलेज), सम्राट कदम (तेरणा कॉलेज), आत्तू आवटे (दत्तनगर), दुर्गेश घोणे (तुळजापूर), अभि डोलारे (तुळजापूर), यश मुंढे (तेरणा कॉलेज), सक्षम थोरात (तेरणा कॉलेज), सुयश तेरकर (तेरणा कॉलेज), विश्वराज जाधव (तेरणा कॉलेज), फर्दीन शेख (तेरणा कॉलेज), गौरव शिंगाडे (भीमनगर), सार्थक शिंगाडे (भीमनगर), ओंकार डोंबाळे (तेरणा कॉलेज), ओम चौधरी (तेरणा कॉलेज), ऋषी धुमाळ (तेरणा कॉलेज), सक्षम मडके (तेरणा कॉलेज) आणि इम्रान मुल्ला (तेरणा कॉलेज) आदी युवकांचा समावेश आहे.
नव्या युवकांच्या सहभागामुळे धाराशिव शहरात काँग्रेस संघटनेच्या विस्ताराला चालना मिळणार असून, आगामी काळात शहरातील विविध भागांत संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.