उजनी धरणावरील एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

  


AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे धाराशिव 
धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - उजनी धरण परिसरात होत असलेल्या एआय डेटा सेंटर (SEED) प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.३० ऑक्टोबर रोजी केली आहे ‌
दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी जलाशय परिसरात जो SEED प्रकल्प प्रस्तावित आहे. तो तेथील पाण्यासाठी घातक असून या उजनी धरण प्रल्पावरून धाराशिव शहराला पाणी पुरवठा होत असून अगोदरच पाणी दूषित आहे. सोलापूर येथील भूजल चाचणी सर्वेक्षणात तेथील पाण्यात कॅन्सर होण्याचे काही घटक आढळून आले होते. त्यातच आता हा प्रकल्प एआय डेटा सेंटर हा प्रकल्प त्या भागात चालू होणार आहे. तर उजनी धरण हे ११७ टीएमसी इतक्या क्षमतेचे असून मागील ४० वर्षांपासून तेथील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे उपयोगी पाणी साठा हा खूप कमी प्रमाणात असून त्या धरणावर जवळपास ३ जिल्ह्यांचा पाणी पुरवठा होतो. जर हा प्रकल्प चालू झाला तर या एआय डेटा सेंटरला ०.५ टीएमसी इतके पाणी लागणार असून ते वापरात आलेले पाणी हे विष समानच आहे. ते पाणी या उजनीच्या धरणात मिसळले जाणार आहे. तसेच या एआय डेटा सेंटरचा
दुष्परिणाम म्हणजे त्या भागातील पाणी पातळी पूर्णपणे संपणार आहे. त्यामुळे अगोदरच धाराशिव जिल्हा हा दुष्काळी असून जे धाराशिव शहराला मिळणारे पाणी आहे ते देखील भविष्यात मिळणार नाही. त्यामुळेच उजनी धरण परिसरातील शेतकरी आणि मच्छीमार व्यवसायिक हे त्या भागात दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील धाराशिव शहरवासियामार्फत त्या आंदोलनाला पाठिंबा राहणार आहे. विशेष म्हणजे तो प्रकल्प होणार नाही यासाठी धाराशिव शहरात देखील भविष्यात मोठे आंदोलन उभे करणार आहोत. याबरोबरच आमदार रोहित पवार आणि आमदार प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनात कायम या प्रकल्पाला विरोध असणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अभ्यास करून हा प्रकल्प कसा घातक आहे यासाठी महाराष्ट्र सरकारला माहिती द्यावी असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मसूद शेख, धाराशिव युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे, नगरसेवक आयाज शेख, खलिफा कुरेशी, इस्माईल बाबा शेख, पंकज भोसले, सरफराज कुरेशी, सुनील आंबेकर, माजी नगरसेवक बाबा मुजावर, नरसिंग मिटकरी, एजाज काझी, रोहित बागल, नाशेर शेख, अफरोज पिरजादे, जयंत देशमुख, कादर खान, अशोक पेठे, अविनाश जाधव, योगेश सोन्ने पाटील, सुशांत बनसोडे, शुभम खटके आधीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.