लोहारा पोलिसांची जुगाराविरोधात कारवाई; पेठसांगवीतून ८५० रुपये जप्त

 


AR न्यूज मराठी रुपेश डोलारे धाराशिव.


लोहारा : लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठसांगवी गावाच्या वेशीजवळ जुगाराविरोधात कारवाई करण्यात आली. दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान बिलाल दाउत पठाण (वय ३८, रा. पेठसांगवी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांच्याकडे मिलन डे मटका जुगाराशी संबंधित साहित्य व ८५० रुपये रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
AR न्यूज मराठी | धाराशिव