तहसीलदार उमरगा येथील दयानंद जवळगे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त.


AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे तुळजापूर.

 
धाराशिव | धाराशिव जिल्हाधिकारी यांचे माजी चालक तथा सध्या उमरगा तहसील कार्यालयात कार्यरत असलेले दयानंद जवळगे हे नियत वयोमानानुसार शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने राजेंद्र धावारे (तांबरी विभाग, धाराशिव) व विजय कांबळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी व आनंद लाभो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.