आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मसला येथे रक्तदान शिबिर; ५१ जणांचे रक्तदान! मसला येथे सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मसला येथे ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच रामेश्वर वैद्य, उपसरपंच श्रीराम खराडे, माजी सरपंच हरिभाऊ काळदाते आणि माजी पंचायत समिती सभापती दिगंबर खराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचावेत, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कदम, विनय सुरवसे, सुनील घोडके, विठ्ठल नरवडे आणि लक्ष्मण वडवराव यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या शिबिरात श्री भगवंत रक्तपेढी, बार्शी यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. सामाजिक जाणीव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.