सन 2024 यात्रा अनुदान मध्ये, तुळजापूर येथील पलंग पालखी मार्ग (साळुंके गल्ली ते आर्य चौक) दुरुस्त करणे बाबत. मा, नगरसेवक राहुल भैय्या खपले यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
दिनांक,१९ सप्टेंबर २०२४ रोजी मा,नगरसेवक राहुल भैय्या खपले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे, या निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर ता. तुळजापूर येथे असलेला पलंग पालखी मार्ग (साळुंके गल्ली ते आर्य चौक) हा अतिशय खराब झालेला असुन नवरात्र मोहत्सवामध्ये या मार्गे नगर येथील येणारी मानाची पलंग पालखीचे मानकरी व देवी भक्त या मार्गे चालत येत असतात. सदर मार्ग खराब झाल्याने तेथे चालनेसुध्दा अवघड झालेले आहे, सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेली आहे.
तरी आपण याबाबत तात्काळ निर्णय घेवुन सन 2024 यात्रा अनुदानामध्ये सदर रस्त्यावरील खट्टे बुजवुन डांबरीकरण करण्यात यावे,असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, या निवेदनावर माजी नगरसेवक राहुल भैय्या खपले,यांची स्वाक्षरी आहे,यावेळी अनमोल साळुंके,नवनाथ आप्पा जगताप, सागर इंगळे,उपस्थित होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.