सन्मान ज्येष्ठ नागरिकांचा आधार काठीचा,तुळजाई सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळाच्या वतीने जेष्ठ नागरिकांना काठीचा आधार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तुळजाई मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. 


    तुळजाई मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त पशुचिकित्सा शिबिर, रक्तदान, किर्तन, भारूड, खेळ पैठणीचा, आरोग्य शिबिर आदि विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाची सांगता ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून करण्यात आली. यावेळी तुळजापूर खुर्द परिसरातील जेष्ठ नागरिकांना उत्कृष्ट प्रतीची "आधाराची काठी" मान्यवरांचा हस्ते सन्मानपूर्वक देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अमीर शेख, रामहरी भोजने, भिकू कुंभार, मकसूद शेख, रमेश भोजने, सुकन्या देशमाने, लक्ष्मी एकदंते आदींची उपस्थिती होती.

  तत्पूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तुळजाई मंडळाचे अध्यक्ष अॅड. बालाजी देशमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नाना भोजने, पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, व्हा. चेअरमन खंडू ताटे, माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, नगरसेविका मंजुषा देशमाने आदिंची उपस्थिती होती. 

     


● यांना सन्मानित करण्यात आले

दिगंबर भोजने, दिगंबर भोजने, बाबुराव माळी, खाजाभाई शेख, वसंतराव माळी, भगवान जाधव, मनोहर फुलसुंदर, नागनाथ भोजने, नागनाथ कने, पांडुरंग मोरे, अंबुबाई बनसोडे, द्रोपती ताटे, सोनाबाई जाधव, शकुंतला साबळे आदि जेष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात आले.